Subscribe Us

Header Ads

राज्यपाल कोश्यारींची गच्छंती ? उद्यापासून दोन दिवस दिल्लीवारी, सूत्रांची माहिती...

 

राज्यपाल कोश्यारींची गच्छंती ? उद्यापासून दोन दिवस दिल्लीवारी, सूत्रांची माहिती...

अ-नगर प्राईड वेब न्यूज टीम (मुंबई) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे 24 व 25 नोव्हेंबर अशा दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. यावेळी ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दिल्लीतील उच्चपदस्थांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे समजत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी राज्यभर कोश्यारी यांचा सुरू केलेला निषेध अजूनही थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. 

कोश्यारी यांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील भारतीय जनता पार्टी देखील अडचणीत सापडत आहे. यामुळे दिल्ली दौऱ्यानंतर कोश्यारींची गच्छंती अटळ मानली जात आहे. 

दरम्यान, दीपक जगदेव यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये राज्यपालांच्या विरोधात महाभियोगाची कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत जनहित याचिका दाखल केली आहे. या कारवाईसाठी घटनेत तरतूद असल्याप्रमाणे पाच न्यायाधीशांचे विशेष घटनापीठ स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली असून घटनेच्या अनुच्छेद 61 व 159 अन्वये लोकसभा अध्यक्ष आणि विधिमंडळाचे अध्यक्ष यांना राज्यपालांना आपल्या सततच्या महापुरुषासंदर्भातल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यामध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण होईल यासाठी भाग पडेल अशा कृत्यासाठी महाभियोग चालविण्याची कारवाई करू द्यावी, असे याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे.

कोश्यारींची हे भारतीय जनता पार्टीचे भूतपूर्व नेते आहेत. ते वयाने ज्येष्ठ आहेत. मात्र त्यांनी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यामध्ये ठीक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अनेक वेळा निर्माण झाला आहे. 

केंद्रातून मिळालेल्या रसदीच्या साह्याने भाजपने राज्यात नुकतेच मोठे सत्तांतर घडवून आणले होते. मात्र आता राज्यपालांच्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांना या पदावरून हटविण्यासंदर्भात केंद्र स्तरावर विचार विनिमय सुरू असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान, राजभवन कार्यालयाने कोश्यारींच्या दिल्ली दौऱ्याची अद्याप पुष्टी केलेली नाही.

Post a Comment

0 Comments