Subscribe Us

Header Ads

मोबाईल वर्ल्ड : OPPO Reno 9 सीरीज 24 नोव्हेंबरला होणार लॉन्च, OPPO ने फीचर्स केले टीज

 


मोबाईल वर्ल्ड : OPPO Reno 9 सीरीज 24 नोव्हेंबरला होणार लॉन्च, OPPO ने फीचर्स केले टीज

अ-नगर प्राईड वेब न्यूज टीम : स्मार्टफोन ब्रँड ओप्पोने आजवर चांगल्या फीचर्सचे आणि ग्राहकांच्या पसंतीला उतरणारे अनेक मोबाईल बाजारात दिले आहेत. आता OPPO ने आपली नवीन स्मार्टफोन सीरीज OPPO Reno 9 ला लाँच करण्याची तयारी केली आहे. 

येत्या दोन दिवसात, 24 नोव्हेंबरला या सीरीजला सर्वात आधी चीनमधील मार्केटमध्ये लॉन्च केले जाणार आहे. या सीरीज अंतर्गत Reno 9, Reno 9 Pro, Reno 9 Pro plus असे वेगवेगळे ऑप्शन्स यामध्ये लाँच केले जाणार आहेत. 

OPPO ने फोनची स्पेसिफिकेशन माहिती टीज करताना फीचर्स देखील माहिती टीज केली आहे. OPPO Reno 9 सीरीजमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असणार आहे. ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनसाठी विशेष सपोर्ट ग्राहकांना मिळणार आहे.

OPPO Reno 9 सीरीजचा संभावित कॅमेरा :
Reno 9 ला 64MP प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेटअप सोबत आणले जाईल. OPPO Reno 9 प्रो सोबत ५० मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळू शकतो.

OPPO Reno 9 सीरीजची बॅटरी :
OPPO Reno 9 सोबत 4,500mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. 

Post a Comment

0 Comments