Subscribe Us

Header Ads

हेल्थ टिप्स : शांत झोप व लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय करावे ? जाणून घ्या उपाय

 

हेल्थ टिप्स : शांत झोप व लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय करावे ? जाणून घ्या उपाय 

अ - नगर प्राईड वेब न्यूज टीम : कपालभाती हा प्राणायामाचा प्रकार नसून शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. योग विद्याशास्त्रामध्ये कपालभातीचा समावेश हा षटकर्मामध्ये केला आहे. 

वात, पित्त, कफ यांचे शरीरात संतुलन बिघडल्यास अनेक आजार उद्भवू शकतात. हे दोष दूर करण्यासाठी षटकर्म केले जातात.

यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. शरीराला अनावश्यक असणारे असे घटक बाहेर पडल्याने आरोग्य तंदुरुस्त राहते.

कपालभाती करण्याचे अनेक फायदे आहेत. 

१. मेंदूची कार्यप्रणाली सुधारते. 

२. गॅस आणि बद्धकोष्ठता याची समस्या दूर होते. 

३. मेटाबोलिजम रेट वाढवून लठ्ठपणा कमी होतो. 

४. शरीर ताजेतवाने राहते. 

५. अस्थमा आणि सायनस या समस्येवर कपालभाती आराम देण्याचे काम करते. 

६. हिमोग्लोबिनची पातळी वाढते. 

७. शांत झोप लागते.

कपालभाती करण्याची विशिष्ट पद्धती असून तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच ती शिकून मगच त्याची कृती करणे फायदेशीर ठरते.

Post a Comment

0 Comments