Subscribe Us

Header Ads

Breaking News : संजय काळे गटाला सारोळकरांनी चारली धूळ, रवींद्र कडूस गटाने तिसऱ्यांदा रोवला विजयाचा झेंडा...


संजय काळे गटाला सारोळकरांनी चारली धूळ, रवींद्र कडूस गटाने तिसऱ्यांदा रोवला विजयाचा झेंडा...

अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : सारोळा कासार ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक चुरशीची होईल अशी चर्चा होती. मात्र संजय काळे गटाला सारोळकर मतदारांनी धूळ चारली असून रवींद्र कडूस गटाने तिसऱ्यांदा विजयाचा झेंडा रोवला आहे. रवींद्र कडूस हे सरपंच पदाच्या यशाचे शिल्पकार असून ग्रामस्थांकडून आरती कडूस यांच्या निवडीबद्दल जल्लोष करण्यात येत आहे. तर संजय काळे गटात सामसूम आहे. 

संजय काळे हे नगर तालुक्यातील ज्येष्ठ नेते गुलाबराव काळे यांचे पुतणे असून अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे सख्खे चुलत बंधू आहेत. किरण काळे आणि रवींद्र कडूस यांची मैत्री सर्वश्रुत आहे. या निवडणुकीत संजय काळे यांना गुलाबराव काळे, किरण काळे यांची मदत मिळाल्याचे पाहायला मिळाले नाही. या उलट किरण काळे, रवींद्र कडूस या मैत्रीने निवडणूक जिंकण्यासाठी पडद्यामागून मैत्री निभावली असल्याची चर्चा सारोळकर मतदारांमध्ये रंगली आहे. संजय काळे यांच्या पराभवाचे हे प्रमुख कारण मानले जात आहे. 

नगर तालुक्यातील ही लढत लक्षवेधी होईल असा अनेकांचा कयास होता. मात्र सरपंचपदाची निवड ही एकतर्फीच झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे संजय काळे यांच्या सुविद्य पत्नी सुजाता संजय काळे यांचा मतदारांनी दारूण पराभव केला आहे. काळे यांना अपयश तसे नवीन नसून याआधीच्या सोसायटी निवडणुकीत देखील मतदारांनी त्यावेळच्या कडुस-काळे यांच्या पॅनल मधील सर्वांना निवडून देत असताना केवळ संजय काळे यांना एकट्याला खड्यासारखे वेचून बाजूला टाकत पराभूत केले होते. 

त्यानंतर झालेल्या सोसायटी निवडणुकीत काळे यांच्यावर मतदार यादीत फेरफार केल्याचा गंभीर आरोप झाला होता. त्यानंतर त्यांनी रवींद्र कडूस यांच्या विरोधात अनेकांना एकत्र करत मोट बांधली होती. यामध्ये शिक्षक नेते संजय धामणे यांचे चिरंजीव अनिरुद्ध यांचा जरी विजय झाला असला तरी देखील काळे गटातील महत्त्वाचे नेते समजले जाणारे जयप्रकाश कडूस यांचा रवींद्र कडूस यांनी विक्रमी मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सारोळकरांनी संजय काळे यांचे नेतृत्व सपशेल नाकारल्याचे पाहायला मिळाले आहे. 



Post a Comment

0 Comments