Subscribe Us

Header Ads

महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्षपदी पूनमताई वन्नम, सावेडी विभाग प्रमुखपदी अशोक दशरथ शिंदे, तर साफसफाई कामगार संघटकपदी प्रशांत जाधव यांची निवड

अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या, तर काही ठिकाणी खांदेपालट करण्यात आला आहे. महिला काँग्रेसच्या शहर ब्लॉक अध्यक्षपदी पूनमताई वन्नम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावेडी काँग्रेस विभाग प्रमुखपदी अशोक दशरथ शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. तर काँग्रेसच्या साफसफाई कामगार विभागाच्या शहर संघटकपदाची जबाबदारी प्रशांत जाधव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

काळे यांच्या हस्ते नुकतेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. वन्नम यापूर्वीच्या महिला कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी महिलांसाठी अनेक चांगले उपक्रम राबविले. महिलांचे संघटन मजबूत केले. 

त्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून त्यांना बढती देण्यात आली आहे. वन्नम या पद्मशाली समाजाच्या आहेत. नगर शहरात समाजाची लोकसंख्या मोठी आहे. या निमित्ताने काँग्रेसने पद्मशाली समाजाला पक्ष संघटनेत महत्त्वाचे स्थान दिले आहे. 


अशोक शिंदे यापूर्वी ब्लॉक उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांची देखील बढती करण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांचे ते चिरंजीव आहेत. आगामी मनपा निवडणुकीसाठी ते काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार असून सावेडीतून प्रबळ दावेदार आहेत. 

यापूर्वी अभिनय गायकवाड यांच्यावर ही जबाबदारी होती. त्यात बदल करण्यात आला असून आता शिंदे ही जबाबदारी पाहणार आहेत. सावेडीमध्ये एकूण सुमारे सहा प्रभागांचा समावेश असून २४ नगरसेवक या विभागातून निवडले जातात. त्यामुळे सावेडी विभाग प्रमुख पदाची जबाबदारी महत्त्वाची समजली जाते. 

प्रशांत जाधव हे शहरातील साफसफाई कामगारांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या माध्यमातून काम करीत आहेत. सिद्धार्थ नगर, रामवाडी अशा सर्वच भागांमध्ये त्यांचे उत्तम संघटन आहे. शहरातली साफसफाई कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण किरण काळे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणार असल्याचे त्यांनी निवडीनंतर म्हटले आहे. 

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे नेते अनिस चुडीवाला, माजी नगरसेवक फैय्याज शेख, संतोषभाऊ जाधव, गणेश चव्हाण, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, विदयार्थी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर कांबळे, डॉ. जाहिदा शेख, शैलाताई लांडे, अरुणा आंबेकर, शेख अलीमा, इंटक जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे, मोमीन सय्यद, चंकी कदम, आकाश जाधव, गौरव घोरपडे, आकाश अल्हाट, आनंद जवंजाळ, बिभीषण चव्हाण, सोफियान रंगरेज, लखन गाडे, नितीन शिरसाट, अनिल बेल्हेकर, राजू साळवे, विजय शिरसाट, बाळासाहेब वाव्हळ आदींसह सर्व फ्रंटल, आघाड्या, सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments