Subscribe Us

Header Ads

नगरकरांना बरोबर घेऊन शहर विकासाचे नियोजन केले आहे - आ. संग्राम जगताप


अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : नगरकरांना बरोबर घेऊन शहर विकासाचे नियोजन केले आहे. टप्प्याटप्प्याने एक-एक प्रश्न हाती घेऊन कायमस्वरूपी विकास कामं मार्गी लावली जात आहेत. नगरसेवकांना पूर्वी लाईट, कचरा या प्रश्नावरच काम करावे लागत होते, मात्र आता हे दोन्ही प्रश्न कायमस्वरूपीचे मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. 

प्रभाग क्रमांक दोन मधील सूर्य नगर भागातील सांस्कृतिक भवनाच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. आ. जगताप म्हणाले की, नगरसेवकांना आता व्यापक विचारातून प्रभागातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळ मिळणार आहे. लवकरच शहराचा पाणी प्रश्न ही कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. उपनगरामध्ये रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. विकास कामांबरोबर नागरिकांचे सामाजिक प्रश्न ही तितकेच महत्त्वाचे असून तेही सोडवले गेले पाहिजेत. 


नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे यांनी सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी केल्यानंतर तातडीने निधी उपलब्ध करून दिला आहे. भव्य सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून अध्यात्मिक, धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी या जागेचा उपयोग होईल.

यावेळी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, नगरसेविका पल्लवी जाधव, उद्योजक संजय बुधवंत, दानवे सर, सावंत सर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments