Subscribe Us

Header Ads

ब्रेकिंग : खासदारांनी जनतेला फसवले.. तर आमदारांनी जनतेसह शरद पवार, अजित पवारांना फसवले - किरण काळेंची घणाघाती टीका


अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम :  निवडणुकीत शहाराचे विद्यमान आमदालोकसभार विद्यमान खासदारांच्या विरोधात उभे होते. ते नको म्हणून शहरवासीयांनी खासदारांना पन्नास हजारांचे मताधिक्य दिले. मात्र खासदारांनी त्यांच्याच गळ्यात गळे घालून मिरवत नगरकरांचा विश्वासघात केला. आमदारांनी राष्ट्रवादीची खासदारकीची उमेदवारी घेतली खरी. मात्र त्यांनी अंधारात हातमिळवणी करत जनतेसह शरद पवार, अजित पवारांनाच फसवले. जनतेला आणि नेत्यांना एकदा फसवता येते. पुन्हा पुन्हा फसवता येत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशी घाणाघाती टीका शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहर आणि दक्षिण लोकसभेच्या लोकप्रतिनिधींची नावे न घेता केली आहे. 


आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रभाग निहाय कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. काळे म्हणाले दशरखुर्द शरद पवार यांनी स्वतः राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांना भारतीय जनता पार्टी बरोबर कोणतेही परिस्थितीमध्ये आघाडी करू नये अशी स्पष्ट सूचना केली होती. मात्र आमदारांनी पवार यांचाही आदेश धुडकावून लावला. पवार हे ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत. आम्हाला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. मात्र ते पवारांपेक्षाही स्वतःला मोठे समजत असावेत. म्हणूनच त्यांनी लोकसभेलाही पवारांना फसवले आणि मनपात भाजप बरोबर आघाडी करत त्याही वेळी नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खूपसल्याचा आरोप यावेळी काळे यांनी केला. 


काळे म्हणाले, शहराची दुरावस्था आहे. रस्त्यांसाठी काँग्रेसने मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करत या ज्वलंत प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधल्यानंतर झोपलेल्या राष्ट्रवादीच्या शहर लोकप्रिनिधींना तर जागा आली नाहीच. पण खासदार शहरातल्या रस्त्यांसाठी २५ कोटी मुख्यमंत्र्यांकडून आणतोच म्हणून मुंबईला गेले. मात्र ते फक्त पाचच कोटी घेऊन आले. 

ते म्हणतात ३२ कोटींबाबत माहित नाही. पण मी जनतेचे पैसे वाया जाऊ देणार नाही. राष्ट्रवादीच्या सहभागाच्या पुराव्यांसह म्हासणवाटा महाघोटाळ्यासाठी भाजपच्या पाच नगरसेवकांची पत्र रेकॉर्डवर आहेत. स्वपक्षाच्याच नगरसेवकांकडून सुरू असणारी लूट माहीत असूनही कानावर हात ठेवणाऱ्यांचा दुटप्पीपणा सुज्ञ नगरकर ओळखून आहेत. 

काँग्रेसने सहाही नगरसेवकांना पक्षादेश बजावला. सगळ्यांनी आयुक्तांना तात्काळ विरोधाची पत्र सादर केली. पक्षाची भूमिका पाण्यासारखी स्वच्छ असून भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचे काळे म्हणाले.

Post a Comment

0 Comments