Subscribe Us

Header Ads

राष्ट्रवादीचे आ. जगताप यांच्या सारसनगर बालेकिल्ल्यात काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंतीचा कार्यक्रम संपन्न


अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : सारसनगर हा राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागात त्यांचा प्रचंड दबदबा आहे. मात्र आज याच बालेकिल्ल्यामध्ये अभयराजे बडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमाला शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची उपस्थिती होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमुळे जोरदार चर्चा या भागातील नागरिकांमध्ये ऐकायला मिळाली. 


महाराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने इंजिनियर अभय बडे आणि सहकाऱ्यांच्या पुढाकारातून शिवजयंती निमित्त शिवआरती आणि शिवव्याख्याते अंबादास शिंदे यांच्या जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती संपन्न झाली. यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, भुविकास बँकेचे माजी संचालक बी. के. कडूस पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे गिरीधर हांडे, ज्येष्ठ शिवसैनिक श्रीकांत चेमटे सर, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, डोंगरे सर यांच्यासह सारसनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी काळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. जगाच्या पाठीवरती घरात राजे परंपरा नसतानाही रयतेतून राजे झालेले ते एकमेव राजे आहेत. ते उत्तम प्रशासक सुद्धा होते. हातात तलवार घेण्याबरोबरच त्यांनी मोजपट्टी घेऊन त्याकाळी जमीन सुद्धा मोजायला यंत्रणा निर्माण केली. त्याचे रेकॉर्ड जतन केले. 

माझ्या राज्यातील रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा कुणाचा धक्का लागू देणार नाही. त्यासाठी जीवाचे रान करीन, असे ते म्हणायचे. त्यामुळे त्यांना "लोकपालक" म्हणून देखील ओळखलं जायचं. त्याकाळी जर कोणी कारणाशिवाय वृक्षांची कत्तल केली तर त्या बदल्यात झाड लावून ते जगवण्याची शिक्षा त्यांच्या राज्यात दिली जायची. यामुळे ते "पर्यावरण रक्षक" देखील होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या आदर्शावरच आजचा आदर्श समाज निर्माण होऊ शकतो, असे यावेळी काळे म्हणाले. 

Post a Comment

0 Comments