Subscribe Us

Header Ads

Health - संजय झिंजे मित्र मंडळाने रक्तदान शिबिराच्या आयोजनातून समाजापुढे आदर्श निर्माण केला : किरण काळे

अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : मानवतेची सेवा करणे ही आपली जुनी परंपरा आहे. कोणत्याही प्रकारचे दान करणे हा आपला संस्कार आहे. त्यातही रक्तदान करणे हे सर्वश्रेष्ठ रक्तदान समजले जाते. संजय झिंजे मित्र मंडळाने रक्तदान शिबिराच्या आयोजनातून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. कष्टकरी, गोरगरिबांसाठी सतत झटणाऱ्या माजी नगरसेवक संजय झिंजे आणि त्यांच्या मित्र परिवाराने यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी केले आहे. 

संजय झिंजे मित्र मंडळाने अहमदनगर हॉकर्स संघटना, अहमदनगर महानगरपालिका ब्लड बँक, उर्जिता फाउंडेशन, शहर सुधार समिती, रहमत सुलतान फाउंडेशन, आम आदमी पार्टी कामगार संघटना महासंघ आदींच्या संयुक्त विद्यमाने  शिवजयंतीचे औचित्य साधून चितळे रोड येथील नेहरू मार्केट परिसरामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी काळे बोलत होते.

माजी नगरसेवक संजय झिंजे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी कॉम्रेड भैरवनाथ वाकळे, रहमत सुलतान फाउंडेशनचे युनूसभाई तांबटकर, सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई मेढे, फिरोज शेख, सचिन सावंत, श्याम वागस्कर, अहमदनगर फाउंडेशनचे अल्तमश जरीवाला ॲड. अश्रफ शेख, अनिकेत झिंजे, शुभम झिंजे, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रविण गीते, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, ब्लॉक काँग्रेस महिला अध्यक्ष पूनमताई वन्नम, महासचिव इमरान बागवान, हनीफ मोहम्मद जहागीरदार, हाफिजुद्दीन सय्यद, मोहनराव वाखुरे, प्रशांत जाधव, गणेश आपरे,  आकाश आल्हाट, गौरव घोरपडे, शंकर आव्हाड, विनोद दिवटे, राहुल सावंत, किशोर कांबळे, बालाजी जवंजाळ, सईद खान आदी यावेळी उपस्थित होते. 


काळे म्हणाले की, धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे अनेक व्याधी जडण्याचे प्रमाण समाजात वाढले आहे. यातून अनेक प्रकारच्या शस्त्रक्रियांना लोकांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी रक्ताची गरज भासते. रक्ताची असणारी गरज आणि उपलब्ध असणारे रक्त याचे प्रमाण अलीकडील काळात व्यस्त होत चालले आहे. यामुळे रक्तदात्यांची संख्या समाजात वाढणे आवश्यक आहे. रक्त दिल्याने रक्त कमी होते असा काहीसा गैरसमज आजही समाजामध्ये आहे. मात्र सामाजिक बांधिलकी जपत हा गैरसमज दूर करत जास्तीत जास्त रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. विशेषत: निरोगी युवकांनी यामध्ये मोठा सहभाग नोंदवण्याची गरज आहे. 

संजय झिंजे आणि मित्र परिवाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करत समाजापुढे आदर्श वस्तूपाठ निर्माण केला आहे. समाजाची गरज लक्षात घेऊन त्यांनी घेतलेला पुढाकार हा गरजवंतांना मदतीचा हात पुढे करणारा आहे. यामुळे अनेक रुग्णांना रक्त उपलब्ध झाले आहे. मानवतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. या उपक्रमाच्या आयोजनातून रक्तदान करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. भविष्यात जेव्हा केव्हा अशा रक्तदात्यांची गरज भासेल तेव्हा गरजवंताच्या मदतीला धावून येण्याचा मित्र मंडळाने केलेला निश्चय हा गौरवास्पद असल्याचे यावेळी बोलताना काळे म्हणाले. 

Post a Comment

0 Comments