Subscribe Us

Header Ads

ब्रेकिंग Video : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अफजल शेखवर एमपीडी कारवाई करण्याची आ. नितेश राणेंची लक्षवेधीद्वारे विधानसभेत मागणी... आ. संग्राम जगतापांनी स्वतःच्या मतदारसंघातील प्रश्न असून देखील पळ काढल्याची शहरात चर्चा... विधानसभेतील चर्चेत त्यांचा सहभागच नाही


समाजामध्ये बंधू भावाचं वातावरण ठेवलं पाहिजे - माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात 

मुंबई : रामवाडी प्रकरणावरून भाजप नेते आ. नितेश राणे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी राणे यांनी पोलीस प्रशासनावर अनेक आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी अफजल शेख याच्यावर या प्रकरणात एमपीडी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी यावेळी राणे यांनी सभागृहात केली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराचे आ. संग्राम जगताप हे चर्चेत सहभागी झाले नाही. त्यांनी त्यांचे कोणतेच मत मांडले नाही. यावेळी माजी मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी या लक्षवेधीवर हरकत घेतली. नगरमध्ये सामाजिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. 

सदर लक्षवेधी वेळी झालेल्या संवादाची व्हिडिओ क्लिप पाहण्यासाठी युट्युबची लिंक पुढे दिली आहे. https://youtu.be/QKLW89-SM_E 

सौजन्य : DNA News Marathi

अफजल शेख हा आ.संग्राम जगताप यांचा कट्टर समर्थक असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे संग्राम जगताप हे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील एवढ्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना ते मात्र या चर्चेत सहभागी झाले नाहीत. जाणीवपूर्वक त्यांनी यातून पळ काढल्याची चर्चा यामुळे शहरात सुरू झाली आहे. 


मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी समाजामध्ये बंधू भावाचं वातावरण राहिले पाहिजे असे म्हणत यावेळी आक्रमकपणे बाजू मांडली. 

आ.थोरात म्हणाले की, चुकीची लक्षवेधी केली गेली आहे. एक तर ती स्वीकारायला नको होती. अथवा त्याची चुकीची मांडणी बदलायला हवी होती. सामाजिक तेढ वाढवून आपल्याला राज्य चालविता येणार नाही. गुन्हेगाराला जरूर शिक्षा द्या. पण त्याला समाजाचे आणि धर्माचे स्वरूप देणं हे अजिबात योग्य नाही. विधानसभा अध्यक्ष कार्यालयाने एखादी लक्षवेधी स्वीकारताना त्याच ड्राफ्टिंग आधी तपासून घेतलं पाहिजे. आपल्याला राज्य चालवायचे आहे. ते शांततेने चालवले पाहिजे. समाजामध्ये बंधू भावाचं वातावरण ठेवलं पाहिजे.

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी लक्षवेधीला उत्तर देताना म्हणाले की, छत्रपति संभाजीनगरचे स्टेटस का ठेवले यावरून हा वाद झाला होता. मात्र उत्तरात आम्ही तो जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून तसा उल्लेख ठेवला नाही. अफजल शेख याला ३०७ अन्वये गुन्हा दाखल होऊन देखील न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. धार्मिक विटंबना केल्याचं तपासात रिपोर्टवर लेखी आलेलं नाही. पण आ. राणे यांनी तसेच फोटो दाखवले आहेत.  

इथला वाद हा हिंदू - मुस्लिम तेढ निर्माण व्हावा म्हणून झाला आहे. घडल्या प्रकाराची पूर्ण फेर तपासणी पुन्हा करण्यात येईल. अफजल शेख याला दिलेल्या अंतरीम अटकपूर्व जामीनाच्या विरोधात पोलीस प्रशासनाच्या वतीने अपील करण्यात येईल. स्थानिक पोलिसांची जर यात काही चूक आढळली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी घोषणा यावेळी गृहमंत्री फडणवीस यांनी सभागृहात केली.



Post a Comment

0 Comments