प्रतिनिधी : कर्नाटक विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. तेथील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये भाजप प्रणित संघटनांच्या वतीने गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता कोतवाली पोलीस स्टेशनच्या वतीने शहर काँग्रेसच्या चितळे रोडवरील शिवनेरी कार्यालयावर पोलिसांचा पहारा लावण्यात आला आहे. शहर पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांनी काँग्रेस कार्यालयास भेट देऊन समक्ष पाहणी केली आहे. दरम्यान, कुणी आमच्या अंगावर आल्यास त्यांना शिंगावर घेऊ, असा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांनी दिला आहे.
उत्तर प्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या कार्यालयांवर हल्ले होत आहेत. यामुळे नगर शहरात देखील पोलीस खबरदारी घेत आहेत. युवक काँग्रेसने म्हटले आहे की, लोकशाही आहे. काँग्रेस पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन चालणार पक्ष आहे. नगर शहराततील काँग्रेस पक्षाची भूमिका ही शहर विकासाची असून गुंडगिरी, अन्याया विरोधातील आहे. आमच्या काँग्रेस पक्षाचे शिवनेरी कार्यालय तथा शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे जनसंपर्क कार्यालय म्हणजे या शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक, कष्टकरी, गोरगरीब, महिला भगिनी, अपंग बांधव यांच्यासाठीच आधार केंद्र आहे.
छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरी हे या कार्यालयाचे नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर काँग्रेस कार्यकर्ते काम करतात. त्यामुळे छत्रपतींच्या नावाने असणाऱ्या कार्यालयावर हल्ला करण्याचा कुणी विचार केला तर त्यांना देखील जशास तसे उत्तर काँग्रेस कार्यकर्ते देतील, असा इशारा गीते यांनी युवक काँग्रेसच्या वतीने दिला आहे.
नगरकरांची सेवा हा काँग्रेसचा संदेश
शहर काँग्रेस कार्यालयाच्या दर्शनी भागात किरण काळे यांचा संदेश असून यामध्ये म्हटले आहे की, नगर हे माझं घर. रात्रंदिन साथ देणारे सहकारी बंधू भगिनी माझी ताकद. या शहरातील नागरिकांची सुख - दुःख, ही माझी सुख - दुःख. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक हे माझे कर्तव्य. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, हेच माझं ऐश्वर्य. शहराचा सर्वांगीण विकास, हाच माझा एकमेव ध्यास. या विचाराने काम करणाऱ्या छत्रपतींच्या नावाने असणाऱ्या कार्यालयावर हल्ला केल्यास हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. आम्ही त्यासाठी सज्ज आहोत, असा इशारा गीते यांनी दिला आहे.
1 Comments
भारतीय जनता पार्टीचा निषेध
ReplyDelete