Subscribe Us

Header Ads

इंजि. विजयकुमार ठुबेंनी मराठा समाजाला दिशा देण्याचे काम केले - किरण काळे

 

मराठा सेवा पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा काँग्रेसच्या वतीने सत्कार 

प्रतिनिधी : मराठा समाजाच्या प्रगतीसाठी मराठा सेवा संघाने मोठे काम केले आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही चळवळ अहमदनगर शहर व जिल्ह्यात रुजविण्यात इंजि. विजयकुमार ठुबे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी मराठा समाजाला दिशा देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. मराठा सेवा पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी नवनिर्वाचित संचालक शिवश्री किशोर मरकड, शिवश्री बाळकृष्ण काळे, शिवश्री उदय अनभुले, शिवश्री लक्ष्मण सोनाळे, शिवश्री राकेश कातोरे, शिवश्री इंजि. संभाजी मते, शिवश्री इंजि. बाळासाहेब सोनाळे, शिवश्री बापू राजेभोसले, शिवश्री कालिदास शिंदे, शिवश्री प्रा. किसन पायमोडे, शिवश्री सतीश इंगळे, शिवश्री ज्ञानदेव पांडुळे, शिवश्री काशिनाथ डोंगरे, शिवश्री रवींद्र शितोळे, शिवमती सुजाता ठुबे, शिवमती करुणा काळे, शिवमती राजश्री शितोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवश्री अशोक वारकड व शिवश्री राजेंद्र ढोणे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माजी नगरसेवक संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, बडे भोलेचे संचालक दांगट आदी यावेळी उपस्थित होते. 

काळे म्हणाले की, मराठा सेवा संघ प्रणित पतसंस्थेच्या उभारणीतून मराठा समाजासह सर्वच बहुजन समाज बांधवांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आर्थिक ताकद दिली गेली. त्यामुळे अनेकांचे संसार उभे राहिले. संस्थेचा पारदर्शी कारभार राहिल्यामुळे पतसंस्था नफ्यात असून ठेवीदारांचे हित जोपासण्याचे काम झाले आहे.  संस्थेच्या ठेवी रु. ३० कोटींवरून आगामी काळात रू. १०० कोटींवर जाव्यात यासाठी नवनिर्वाचित संचालकांनी काम करावे. 

ठुबे म्हणाले की, मराठा समाज संघटित होण्याची गरज आहे. शासकीय सेवेत असताना आम्ही जिल्ह्यासह राज्यभरात चळवळ उभी केली. मात्र आता मी सेवानिवृत्त झालो असल्यामुळे संस्थेचा जास्तीत जास्त विस्तार करणे, सभासदांचे हित पारदर्शी कारभार करत जोपासणे यासाठी काम करणार आहे. अद्यावत प्रणाली कारभारात आणणार असून संस्थेची स्वमालकीची भव्य इमारत उभी करण्याचा आमचा मानस आहे. 

सहकार महर्षी गुंदेचा यांचे काम पथदर्शी 

काळे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते सहकार महर्षी स्व. सुवालाल गुंदेचा यांनी सहकाराच्या क्षेत्रामध्ये पथदर्शी असे काम केले. जैन ओसवाल सहकार महर्षी सुवालालजी गुंदेचा पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक मनोज गुंदेचा यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कारभाराची माहिती दिली. त्याला उत्तर देताना ठुबे म्हणाले, चांगल्या गोष्टींची देवाण-घेवाण झाली पाहिजे. दोन्ही पतसंस्था एकाच वेळी स्थापन झाल्या. दोन्हींचा कारभार हा सभासदांना समाधान देणारा राहिला आहे. आभार किशोर मरकड यांनी मांडले. 

Post a Comment

0 Comments