Subscribe Us

Header Ads

उद्योग जगत बातमी : माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शहर काँग्रेस केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमधील उद्योजक, कामगारांच्या पाठीशी - किरण काळे.. "ती" विरोधाची भूमिका काँग्रेसची नाही...


औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित कामे मनपाने तातडीने मार्गी लावावीत, काँग्रेसची मनपा आयुक्तांची भेट घेत मागणी

प्रतिनिधी : केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमधील अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्नासह मूलभूत सुविधांची सर्व प्रलंबित कामे मनपाने तातडीने मार्गी लावावित. त्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने समक्ष भेट घेत केली आहे. या ठिकाणी काम करणारे उद्योजक, कामगार हे शहराच्या विकासातील महत्त्वाचे घटक आहेत. सुरुवातीच्या काळापासूनच काँग्रेसने या वसाहतीसाठी माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक भूमिका घेतली असून शहर काँग्रेस उद्योजक, कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे प्रतिपादन काळे यांनी केले आहे. 


किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने मनपा आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेत निवेदन देऊन चर्चा करत असतानाचे दिसत आहे. 

काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केडगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची देखील भेट घेतली असून त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली आहे. यावेळी ते बोलत होते. यावेळी केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष सतीश बोरा, तज्ञ संचालक अरविंद गुंदेचा, उद्योजक मेहुल भंडारी, माजी नगरसेवक संजय झिंजे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, केडगाव काँग्रेस विभागप्रमुख विलास उबाळे, सचिव रतिलाल भंडारी, बाबासाहेब वैरागळ, दीपक काकडे आदींसह उद्योजक उपस्थित होते. 


केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट मधील उद्योजकांशी चर्चा करताना शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे. यावेळी केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष सतीश बोरा, तज्ञ संचालक अरविंद गुंदेचा, उद्योजक मेहुल भंडारी, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, मनोज गुंदेचा, विलास उबाळे, रतिलाल भंडारी, बाबासाहेब वैरागळ, दीपक काकडे आदींसह उद्योजक उपस्थित होते.  

काळे म्हणाले की, नगर एमआयडीसीमधील मोठ, मोठ्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, लघुउद्योजकांची तसेच केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट मधील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेसने सुरुवातीपासूनच पुढाकार घेतलेला आहे. तत्कालीन महसूल मंत्री आ. थोरात यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, मनपाचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी थोरातांनी आयुक्तांना विकास कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. 


किरण काळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या अहमदनगर एमआयडीसी मधील उद्योजकांच्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात घेण्यात आलेल्या त्यावेळच्या बैठकीत उद्योजकांना मार्गदर्शन करताना माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच सर्व विभागांचे जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात देखील शहरातील उद्योजकांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली होती. मात्र अचानक सरकारमध्ये खांदेपालट झाला. त्यानंतर ही कामे प्रलंबित राहिली. शहर काँग्रेसची भूमिका ही केडगावसह शहरातील सर्वच उद्योजक, कामगार, व्यापारी बांधवांच्या पाठीशी उभी राहण्याची आहे. यावर हजारो कामगार अवलंबून आहेत. त्यामुळे विकास कामे करताना संकुचित मनोवृत्तीतून पाहणे योग्य नाही. काँग्रेसचे व्हिजन हे शहराला उद्योग नगरी करत विकसित शहर उभे करण्याचे आहे.


किरण काळे यांच्या मागणीवरून तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात अहमदनगर शहरातील उद्योजकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  

काळे पुढे म्हणाले की, 
१४० पेक्षा जास्त कारखाने केडगावमध्ये सध्या सुरू आहेत. ३००० पेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो. महानगरपालिकेला उद्योजक दरवर्षी सुमारे पाच ते सहा कोटींचा कर देतात. मागील दहा वर्षांमध्ये सरासरी ६० कोटी पेक्षा अधिक कर उद्योजकांनी दिलेला असताना देखील महापालिकेने जबाबदारी झटकण्याचे कारण नाही. वसाहतीतील ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईटची कामे देखील मनपाने मार्गी लावली पाहिजेत. काँग्रेसच्या सकारात्मक भूमिकेचे इंडस्ट्रीयल इस्टेटचे अध्यक्ष संतोष बोरा, अरविंद गुंदेचा यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्वागत केले. 

माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून यापूर्वी केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट मधील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी किरण काळे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळच्या बैठकीत उद्योजकांचे प्रश्न मांडताना काळे.  

"ती" काँग्रेसची भूमिका नाही
इंडस्ट्रियल इस्टेट मधील उद्योजक, कामगारांच्या वतीने मनपाकडून मुलभूत सोयी सुविधांची कामे पूर्ण करण्याच्या मागणीला काँग्रेसचे पदाधिकारी दीप चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे विरोध केला होता. त्यावर उद्योजकांनी चव्हाण यांच्या विरोधात पत्रक काढत खडे बोल सुनावले होते.  याबाबत शहर जिल्हा काँग्रेसने जाहीर खुलासा केला आहे की, चव्हाणांची ती भूमिका वैयक्तिक पातळीवरील आहे. त्याचा काँग्रेस पक्षाशी दुरान्वये देखिल काही एक संबंध नाही. आ. बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्यातून शहरातील उद्योजक, कामगार, व्यापारी यांचे प्रश्न मार्गी लावण्याची काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे मनपा ही उद्योजकांना सोयी सुविधा देण्यापासून पळ काढू शकत नाही, असे संजय झिंजे, अनिस चुडीवाला, रतीलाल भंडारी यांनी म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments