Subscribe Us

Header Ads

मोठी बातमी : गुणे आयुर्वेद महाविद्यालया प्रमाणे शहरातील "ती" मोक्याची जागा घशात घालण्याचे कारस्थान उघडे पडल्याने दिशाभूल करणारे खुलासे

होय, मीच तो किरण काळे... 

ऐकलत का ?

प्रतिनिधी : हिंद सेवा मंडळ भूखंड प्रकरणात माझ्यासह विरोध करणाऱ्या अन्य मंडळाच्या हितचिंतकांचे यात कुठलेही राजकारण आणण्याची इच्छा आणि गरज नाही. शहरातली विविध जमीनी हडपू इच्छिणाऱ्या विविध भूखंड माफीयांची शेकडो प्रकरणे सुज्ञ नगरकरांना माहिती आहेत. शहरातील ताबा गॅंग कोण चालवते हे जग जाहीर आहे. मंडळाच्या या भूखंडाचा प्रश्न नगर शहरातील तरुणांच्या तसेच स्वातंत्र्यसैनिकांनी उभारलेल्या एका महान शिक्षण संस्थेच्या भविष्याशी निगडित आहे. केवळ म्हणूनच जीवा वरील धोके पत्करून ही लढाई मी प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने लढतो आहे. केवळ आयुर्वेद महाविद्यालयाप्रमाणे हिंद सेवा मंडळाची जागा घशात घालण्याचे माजी आमदार यांचे कारस्थान उघडे पडल्याने माजी आमदार अरुण बलभीम जगताप यांच्या मंडळातील प्रवक्त्यांनी दिशाभूल करणारे खुलासे केल्याचा आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. काँग्रेसच्या शिवनेरी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

रविवारी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मंडळाच्या त्या बहुचर्चित भूखंडात बाबतचे धक्कादायक कागदोपत्री पुराव्यांचा जाहीर भांडाफोड करणार असल्याचे काळे यांनी जाहीर केले आहे. 

किरण काळे म्हणाले की, माझ्यासह याला विरोध करणाऱ्या प्रामाणिक विश्वस्त, अजीव सभासद यांच्या या नैतिक संघर्षाला राजकीय म्हटल्याने वस्तुस्थिती बदलता येणार नाही. दलाली करणाऱ्यांच्या पापाला इतिहासाने कधीही माफ केलेले नाही. याची नोंद माझ्यावर बिनबुडाचे, खोटे आरोप करणाऱ्यांनी घ्यावी. मंडळाचे काही पदाधिकारी ताबा मागणाऱ्या जगताप व हर्षल भंडारी या जोडगळीचे प्रवक्ते म्हणून काम करत असल्याची आमची टीका मंडळाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी साधार खरी ठरवली आहे. 

होय, मीच तो किरण काळे...

हेच पदाधिकारी जेव्हा हिंद सेवा मंडळाचेच आदर्श शिक्षक असणारे हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला तेव्हा कुठे लपून बसले होते ? मंडळाचे पदाधिकारी म्हणाले की, किरण काळे कोण आम्ही ओळखत नाही. त्यांना मी आठवण करून देतो की होय मीच तो किरण काळे ज्याने मंडळाच्या सिताराम सारडा विद्यालयाला जेव्हा अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांनी विळखा घातला होता तेव्हा मी आणि शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात जीवावर बेतणारी आंदोलने निर्भीडपणे करून शाळेचा, विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा श्वास मोकळा केला. मंडळाच्या शाळेच्या शंभर मीटर आवारातील अवैध धंदेवाल्यांवर कारवाई केली नाही तर पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर त्यांना कारवाई करण्याकरिता जागे करण्यासाठी ढोल बाजाओ आंदोलननाचा ईशारा देणारा मीच तो किरण काळे आहे. त्यावेळी ४८ तासांच्या आत मंडळाच्या शाळेचा आवार कारवाई होत स्वच्छ झाला. प्रशासन जागे झाले. मात्र मंडळाचे कोणीही पदाधिकारी मंडळाची शाळा अडचणीत असतानाही आणि ते पदाधिकारी मंडळाचे सदस्य असतानाही जागे झाले नव्हते. मी आणि काँग्रेस कार्यकर्ते मंडळाचे सदस्य देखील नसतानाही सर्व काही अंगावर घेत मंडळाच्या शाळा सुरक्षित करण्यासाठी लढत होते. आम्ही ते आमचे कर्तव्यच समजतो. त्यासाठी सदस्य असल्याचा कागदपतत्री तुकडा माझ्याकडे असायलाच हवा याची मला जरूर वाटत नाही. तेव्हा माझ्यावर सर्व संचालकांच्या वतीने गुन्हे दाखल करण्याची धमकी देणारे, कायद्याचे ज्ञान पाजळणारे मंडळाचे पदाधिकारी तज्ञ वकिल आणि जागेचा ताबा मागणारे शहराचे माजी आमदार अरुण जगताप यांनी मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीच कायदेशीर भूमिका का घेतली नाही, असा पलटवार काळे यांनी केला आहे. 

भूखंड माफियांची आणि त्यांच्या दलालांची मन:स्थिती त्यामुळे भयग्रस्त

मंडळाचे हजारो माजी विद्यार्थी, भूखंड प्रकरणापासून अनभिज्ञ असलेल्या मंडळाच्या अनेक सभासदांमधून या प्रकाराबद्दल तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. संपूर्ण समाजावर आपण दहशत निर्माण करू शकतो अशा कल्पनेत असलेल्या भूखंड माफियांची आणि त्यांच्या दलालांची मन:स्थिती त्यामुळे भयग्रस्त झाली आहे. यातून त्यांनी केलेले काही खुलासे धक्कादायक आणि चिंताजनक आहेत. 

किरण काळे म्हणाले, त्यातील काही मोजक्या मुद्द्यांकडे माध्यमांचे आणि जनतेचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. 

काळे म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या वर्तमान संचालकांना मंडळाची मालमत्ता राखता येत नसल्याने ही सुमारे ३.२९ एकर जागा बिल्डर जोडीला देत असल्याची हतबल होत मानद सचिव संजय जोशी यांनी माध्यमांसमोरच कबुली दिली. यापूर्वी सुमारे ८ भूखंडाचे देखील मंडळ संरक्षण करू शकले नसल्याचा त्यांनी स्वतःच केलेला खुलासा त्यांच्या अकार्यक्षमतेचे आणि संस्थेचे हित धुळीस मिळविणारे आहे.  कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मालमत्ता राखता येत नाहीत म्हणून त्या कोणत्याही राजरोसपणे ताबा मारणाऱ्या, धंदेवाईक लोकांच्या, राजश्रयीत गुन्हेगारी पोसणाऱ्यांच्या, बिल्डरांच्या घशात कवडी मोलाने घालणे योग्य आहे काय, असा प्रश्न मंडळाचे सभासद आणि माजी विद्यार्थी समाज माध्यमांवरून मोठ्या संख्येने  विचारत आहेत. 

अहो वकील साहेब, सांगा ना जरा...

गुन्हेगार लोकांनी यापूर्वी लाटलेल्या मंडळाच्या मालकीच्या जागा परत मिळवण्यासाठी कोणत्या कायदेशीर कारवाया मंडळातील तज्ञ पदाधिकारी वकिलांनी आजवर केल्या, याचा खुलासा त्यांनी पत्रकार परिषदेत का केला नाही, असा सवाल मंडळाचे हितकर्ते करीत असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे. 

लाबाडा घरचे अवतान जेवल्या शिवाय खरे नसते

काळे पुढे म्हणाले, यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये हिंद सेवा मंडळाला जागा मागणीसाठी दिलेल्या पत्रात अरूण जगताप -  संतोष भंडारी दुक्कलीने अत्यंत मोघम भाषेत जागेचा मोबदला देऊ, असे म्हटले आहे. शिक्षण संस्थेच्या भूखंडावरील हा राजरोस दरोडा आम्ही समाजासमोर आणला. त्यानंतरच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी २२५ कोटींच्या जागेसाठी जगताप - भंडारी दुक्कलीकडून २५ कोटी रुपये मिळणार असल्याचे स्पष्ट केले. परंतु २५ कोटी रुपये आपण मंडळास देत अथवा देणार असल्याचे कुठेही जगताप - भंडारी  दुक्कलीने लेखी दिलेले नाही. पैसे कसे, कधी देणार, हे सुद्धा स्पष्ट नाही. हे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मंडळाच्या काही सदस्यांनी त्यांना घेरले असता तशी कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे जाहिररित्या सांगितले आहे. २५ कोटी बांधकाम स्वरूपात देऊ म्हणाल्याचे पदाधिकारी तोंडी सांगत आहेत. मराठीत म्हण आहे की "लाबाडा घरचे अवतान जेवल्या शिवाय खरे नसते" हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा टोला काळे यांनी लगावला आहे. 

जागेचे मूल्य २५ कोटी असल्याचे कशाच्या आधारे ठरवले ?

ही जमीन मुळ तकिया ट्रस्टची जमीन आहे. ती विकत घेणाऱ्या लुनिया - मुनोत फर्मने जगताप - भंडारी दुक्कलीशी या जागेच्या खरेदी बाबत साठेखत केलेले आहे काय ? असल्यास किती रकमेचे ? काय मुदतीचे ? याचा कोणताच खुलासा मंडळाचे पदाधिकारी असणाऱ्या तज्ञ वकील साहेबांनी पत्रकार परिषदेत केला नाही. कोणताही कायदेशीर पुरावा हातात नसताना मंडळाचे सत्ताधारी संचालक सांगतात की, लुनिया - मूनोत यांनी ही जागा जगताप - भंडारी जोडीला विकण्याचे ठरवले आहे.

या जागेचे मूल्य २५ कोटी आहे, हे मंडळातील पदाधिकाऱ्यांनी कशाच्या आधारे ठरवले, याचा खुलासा मंडळाने त्यांच्या पत्रकार परिषदेत मंडळाच्या कोणीच केला नाही याकडे काळे यांनी लक्ष वेधले आहे. मुळात या जागेचे सरकारी मूल्य आणि बाजारमूल्य हे जगताप - भंडारी दुक्कल देत असलेल्या कथित २५ कोटीं पेक्षा किमान ९ पट जास्त आहे. जागेचे २५ कोटी मूल्य कशाच्या आधारे ठरवले हे पारदर्शकतेचा आव आणणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नाही. हा तथाकथित आकडा सांगून ते समाजाची, हिंद सेवा मंडळाच्या सर्व सभासदांची, माजी विद्यार्थ्यांची, आजवर मंडळाला आर्थिक सहयोग देणाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची स्पष्ट दिशाभूल करीत आहेत. 

त्याचे पुरावे देणे का टाळले ?

काळे म्हणाले, हिंद सेवा मंडळाला विधी महाविद्यालय काढायचे आहे आणि त्यासाठी पैसे नाहीत, असा खुलासा मंडळातील वकिल महोदयांनी केला. असे विधी महाविद्यालय काढण्यासाठी मंडळाने अर्ज केल्याचे आम्हाला ठाऊक आहे. परंतु पुणे विद्यापीठाने खरोखरच मंडळाला विधी महाविद्यालय काढण्याची परवानगी दिली असेल, तर त्याचे पुरावे मंडळाच्या वकील महोदयांनी पत्रकार परिषदेत देणे आवश्यक होते. ते का टाळले ? याचे उत्तर द्यावे. 

तसले भलते सलते करण्याऐवजी हे करा की

संस्थेला शैक्षणिक उद्दिष्टासाठी पैसेच हवे असतील तर अशा जमिनीबाबत संयुक्त व्यवस्थापनाचे प्रस्ताव अन्य नामांकित शिक्षण संस्थांना देऊन शैक्षणिक प्रकल्प या जागेवर उभे करता आले असते असे काळे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून इंजीनियरिंग, नर्सिंग, वैद्यकीय महाविद्यालय, व्यवसायाभिमुख व्होकेशनल ट्रेनिंग कोर्सेस, मॅनेजमेंट कॉलेज असे रोजगाराभिमुख शैक्षणिक उपक्रम मंडळाला सुरू करता आले असते. कारण ही जमीन ताकिया ट्रस्टने केवळ आणि केवळ शैक्षणिक उद्दिष्टासाठीच हिंद सेवा मंडळाला भाडेपट्ट्याने दिलेली आहे. 

दानशुरांची दिशाभूल करून पिटाळून लावले

हिंद सेवा मंडळाचे दादा चौधरी विद्यालयाचे माजी विद्यार्थी, मंडळाचे एक संस्थापक सदस्य सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि प्रख्यात प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक म्हणजे प्रमोद चौधरी यांनी मंडळाच्या दादा चौधरी शाळेसाठी एक कोटी रुपये देणगी देऊन या शाळेचा अक्षरश: उद्धार केला. याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमी असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे. 

मंडळाच्या ताब्यातील सध्याच्या जगताप - भंडारी यांच्या घशात चाललेल्या जागेवर भव्य शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी मोठा आर्थिक कोट्यावधींचा सहयोग देण्याची तयारी दानशूरांनी दर्शवली होती. त्यावेळी जगताप, भंडारी यांची आधीपासूनच दलाली करणाऱ्या एकाने त्यांची दिशाभूल केली. ही जागा वादात आहे असे सांगून येथे काही शैक्षणिक प्रकल्प होणार नाही असे घाईने सांगून लगेच मिळणारे सुमारे काही कोटी रुपये घालवून मंडळाचे नुकसान केले. अशा लोकांनी पारदर्शकता व संस्था हीत जपत असल्याच्या खोट्या वल्गना करू नयेत. एकीकडे आपल्याकडे पैसे नाहीत असे म्हणायचे आणि दुसरीकडे मिळणारी मोठी मदत नाकारून जागा बिल्डरांच्या घशात घालून काही दलालांना खोके मिळवायचे असल्याने मिळणारी मोठी आर्थिक देणगी पळवून लावायची असा जगताप यांच्यासाठी दलाली करणाऱ्यांचा खाक्या राहिला आहे. 

स्वतःच्या अंगावर उडालेल्या चिखलाचे शिंतोडे इतरांवर उडवण्याचा केविलवाणा प्रयत्न

वस्तुस्थिती लोकांपासून जाणीवपूर्वक लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे. ते म्हणाले, मंडळाच्या मानद सचिवांनी ब्रिजलाल सारडा यांच्या घरी अरुण जगताप आले होते आणि तेथे या जागे बाबत बैठक झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. परंतु ब्रिजलाल सारडा यांनी आणि अन्य पाच संचालकांनी लेखी पत्रात त्यांची भूमिका स्पष्ट मांडली. मंडळाची एक चौरस फूट जागा देखील विकू नये. जे हिंद सेवा मंडळातील आपल्या पूर्वजांनी रक्त आणि घाम गाळून मिळवले आणि उभे केले ते आपण वाढवले नाही तरी किमान राखले तरी पाहिजेच असे लेखी पत्रच सारडा आणि अन्य ५ संचालकांनी वर्तमान सत्ताधारी अरुण जगताप भक्तांना दिले. 

परंतु पत्रकार परिषदेत सारडा यांचा नाम उल्लेख करून स्वतःच्या अंगावर उडालेल्या चिखलाचे शिंतोडे इतरांवर उडवण्याचा केविलवाणा प्रयत्न वर्तमान पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे. मंडळाचे अध्यक्ष म्हणाले की हिंद सेवा मंडळातील मान्यवर आणि प्रतिष्ठित लोकांनी या जमीन व्यवहाराला आक्षेप घेतलेला नाही. त्यांनी काही मान्यवरांची नावे देखील यावेळी घेतली. पण मग अरुण जगताप, हर्षल भंडारी जोडीच्या दलालीची ऑफर नाकारून जमीन देण्यास धाडसाने नकार देणारे मंडळाचे सहा संचालक प्रतिष्ठित आणि मान्यवर नाहीत काय ? असा प्रश्न निर्माण होतो. प्रतिष्ठित आणि मान्यवर असण्याची व्याख्याच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे बदलली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.

इतिहास "यांची" नोंद सुवर्ण अक्षरांनी घेईल

जनाची आणि मनाची लाज बाळगणाऱ्या, हिंद सेवा मंडळाच्या संस्थापकांची जीवनदृष्टी अनुसरणाऱ्या सारडा बंधू, सामजिक - राजकीय नेते अनंत देसाई, राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श शिक्षक मकरंद खेर सर आदी ६ निर्भीड संचालकांचे आम्ही शहर काँग्रेस व मंडळाच्या खऱ्या आणि प्रामाणिक हितचिंतकांच्या वतीने पुन:श्च जाहीर अभिनंदन करतो. जेव्हा मंडळाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मंडळाच्या हिताला बाधा आणणाऱ्या टोळीला विरोध करणारे चारित्र्यसंपन्न सभासद म्हणून इतिहास या ६ जणांची नोंद नक्कीच सुवर्ण अक्षरांनी घेणार आहे, हे अप्रामाणिक लोकांनी विसरू नये, असा टोला किरण काळे यांनी लगावला आहे. 

हिम्मत असेल तर सत्ताधाऱ्यांनी

सर्व सभासदांचा या जमीन व्यवहाराला पाठिंबा असल्याचा दावा वर्तमान संचालकांनी पत्रकार परिषदेत केला. वस्तुतः मंडळाच्या संस्थापकांनी सर्व कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापकांना दिलेला मताधिकार काढून घेऊन त्यांच्या जागेवर आपले सोयरे - धायरे, दुकानातले नोकर, नातेवाईक यांना मंडळाचे सदस्य म्हणून वर्तमान सत्ताधाऱ्यांनी आणून बसवले आहेत. सध्याच्या अनैतिक जमीन विक्री मागे या गर्दीचे बहुमत असल्याचा दावा केला जात आहे. हिम्मत असेल तर या सत्ताधाऱ्यांनी मंडळाच्या संस्थापकांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिलेला मताचा अधिकार पुन्हा त्यांना परत द्यावा. मग जाहीर खुले हात वर करून किंवा मतदान गुप्त पद्धतीने घेऊन दाखवावे असे किरण काळे यांनी जाहीर आव्हान दिले आहे. 

सभासदत्व सर्वांसाठी खुले करा 


मंडळाला यांनी खाजगी कंपनी केले आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडित असणाऱ्या चारित्र्य संपन्न लोकांसाठी (उदा. की ज्यांच्यावर एसपी ऑफिस फोडल्याचे गुन्हे दाखल नाहीत) व माजी विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसाठी सभासदत्व खुले करून देण्याची हिम्मत यांनी दाखवावी असे आव्हान आहे. 

जे दलाली खाऊन जागा भूखंड माफियांच्या घशात घालत आहेत त्यांनी आजवर एक चौरस फूट जागा तरी या स्वतः कधी कुणाला दिली अथवा मिळवून दिली आहे काय ? याचा एक खुलासा करावा, असे माझे जाहीर आव्हान दलालांना असल्याचा घाणाघात किरण काळे यांनी केला आहे. Post a Comment

0 Comments