Subscribe Us

Header Ads

अहमदनगर शहर काँग्रेसमध्ये इन्कमिंग... मनपाच्या "या" सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी किरण काळेंच्या नेतृत्वाखाली केला काँग्रेसमध्ये प्रवेश


अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : काँग्रेस हा भारतीय संविधानाला मानणारा पक्ष आहे. पक्षाने कायम अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी काम केले आहे. मनपाचे निवृत्त सहाय्यक लेखाधिकारी सय्यद हफिजुद्दीन सय्यद राजा यांना सेवानिवृत्तीनंतर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावासा वाटणे ही त्याचीच पावती आहे. पक्षातील त्यांच्या इन्कमिंगसाठी स्वागत असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

अल्पसंख्यांक काँग्रेसचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला यांच्या पुढाकारातून सय्यद यांचा काळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या चितळे रोडवरील शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेश झाला. त्यावेळी ते बोलत होते. काळे म्हणाले की, मुस्लिम, ख्रिश्चन त्याचबरोबर जैन समाजाला सरकारने अल्पसंख्यांक दर्जा दिला आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या विविध घटकांच्या विकासासाठी काँग्रेसने कायम काम केले आहे. 

सय्यद यांनी सुमारे ३२ वर्षांहून  अधिक काळ महानगरपालिकेमध्ये लेखा विभागात प्रामाणिकपणे आपली सेवा केली. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. त्यांच्या अनुभवाचा फायदा अल्पसंख्यांक समाजाबरोबरच शहराला देखील होईल. त्यामुळेच त्यांच्यावर आगामी काळात पक्ष संघटन वाढीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविणार असल्याचे काळे यावेळी म्हणाले. 

अनिस चुडीवाला म्हणाले की, शहरातील अल्पसंख्यांक समाज मोठ्या संख्येने काँग्रेसच्या मागे आहे. मुस्लिम, ख्रिश्चन समाजाबरोबरच जैन, पारसी समाजाला देखील पक्षाकडून शहरात मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याची क्षमता शहर काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या काळेंमध्ये आहे. म्हणूनच शहरात पक्षाची सत्ता नसताना देखील सातत्याने पक्षामध्ये इन्कमिंग सुरू आहे. अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांच्या सोडवण्यासाठी पुढील काळात आक्रमक भूमिका घेत काम केले जाणार आहे. 

काँग्रेसच अल्पसंख्यांक वर्गाला न्याय देऊ शकते 

मी शहराची मनपा नोकरीच्या माध्यमातून आयुष्यभर सेवा केली. माझ्या अनुभवाचा फायदा शहराला व्हावा अशी माझी इच्छा होती. काळे यांचे नेतृत्व सर्व समाज घटकांना धरून चालणारे आहे. निर्भीड आणि उच्चशिक्षित असणारे त्यांचे नेतृत्व शहर विकासासाठी आश्वासक वाटणारा आहे. म्हणूनच मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, काँग्रेसच अल्पसंख्यांक वर्गाला शहरात न्याय देऊ शकते, अशी भावना प्रवेशानंतर सय्यद यांनी व्यक्त केली. 

यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रविण गीते, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, ब्लॉक काँग्रेस महिला अध्यक्ष पूनमताई वन्नम, सांस्कृतिक काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, शहर जिल्हा महासचिव इमरान बागवान, ब्लॉक सचिव हनीफ मोहम्मद जहागीरदार, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, साफसफाई काँग्रेस विभाग शहर संघटक प्रशांत जाधव, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट, गौरव घोरपडे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, युवक काँग्रेस सरचिटणीस विनोद दिवटे, केडगाव काँग्रेसचे राहुल सावंत, विद्यार्थी काँग्रेसचे वरिष्ठ शहर जिल्हा उपाध्यक्ष किशोर कांबळे, बालाजी जवंजाळ, सईद खान आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments